Wednesday, June 9, 2010

डॉ. अमोल कोल्हेच....!!!!

शिवाजी महाराजांवर इंग्रजी सिनेमा

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबईछत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे आले. पण या जाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शक नितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत.महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबाहेर अनेक प्रवाद आहेत. या सा-या प्रवादांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या भाषेतून महाराजांचे कर्तृत्त्व मांडणे आवश्यक आहे. यासाठीच ' ग्रेट वॉरियर राजा शिवछत्रपती ' या नावाने हा सिनेमा बनणार असून तो इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून प्रदर्शित होईल.एखाद्या साहसी हॉलिवूडपटाप्रमाणे यात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधींचे बजेट आखण्यात आल्याचे कळते. त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला ' राजा शिवछत्रपती ' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशन सोहळ्यात या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.या सिनेमासाठी आवश्यक तेथे भव्यदिव्य सेट उभारण्यात येईलच. पण या सेट्सप्रमाणे महाराजांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे किल्ल्यांवर या सिनेमाची चित्रीकरण करण्याची देसाई यांची मनिषा आहे. त्यासाठी ते सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगीही घेणार आहेत.

' राजा शिवछत्रपती ' या मालिकेत महाराजांची भूमिका गाजवणारे डॉ. अमोल कोल्हेच या सिनेमात महाराजांची भूमिका करतील. तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवाजीराजांवर येतोय आंतरराष्ट्रीय चित्रपट
-
Wednesday, June 09, 2010 AT 12:45 AM (IST)

संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवामुंबई -

'हर हर महादेव... जय भवानी...' असा एल्गार पुकारत मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अख्ख्या जगासमोर ठेवण्यासाठी कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई सरसावले आहेत. छत्रपतींच्या जीवनावर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत एक भव्यदिव्य चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य पेलायला ते सज्ज झाले आहेत. "ग्रेट वॉरियर राजा शिवछत्रपती' असे चित्रपटाचे नाव असून बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडच्या तंत्रज्ञांचे सहकार्य यासाठी घेण्यात येणार आहे. येत्या 24 जून रोजी याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूडचे दिग्गज गीतकार गुलजार यांनी आपल्या चित्रपटासाठी लेखन करावे, अशी देसाई यांची इच्छा असून याबाबत ते त्यांना लवकरच गळ घालणार आहेत.नितीन देसाई यांनी "चंद्रकांत प्रॉडक्‍शन' बॅनरखाली "राजा शिवछत्रपती' मालिका बनविली होती. अल्पावधीतच ती घरोघरी कमालीची लोकप्रिय ठरली होती. या मालिकेची आठवण रसिकांच्या मनात सदैव राहावी, याकरिता ते एक डीव्हीडीही काढणार आहेत. याशिवाय "ई टीव्ही मराठी'साठी त्यांनी "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' नावाची मालिकाही बनविली आहे. 14 जूनपासून ती प्रसारित केली जाणार आहे. एकीकडे तिचे काम सुरू असताना लवकरच देसाई संभाजी महाराजांवरही एक मालिका काढणार आहेत. त्यानंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील अतिशय भव्यदिव्य स्वरूपातील हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या कामास ते सुरुवात करणार आहेत. नितीन देसाई म्हणाले, 'आमच्या संभाजी महाराजांवरील मालिकेत डॉ. अमोल कोल्हे संभाजींची भूमिका साकारणार आहेत. शिवाजींची भूमिकाही पुन्हा त्यांच्याकडेच देण्याचा आमचा विचार आहे. छत्रपतींचा इतिहास सगळ्यांना परिचित व्हावा, याकरिता आमचा हा प्रयत्न आहे. चित्रपटाचे चित्रीकरण गड-किल्ल्यांवर करण्यासाठी सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगी घेणार आहे. सेट्‌सपेक्षा प्रत्यक्ष गड आणि किल्ल्यांवर जाऊन चित्रीकरण करणार आहोत. चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे बजेट आम्ही आखलेले आहे.''लेखनासाठी गुलजारना गळआपल्या धडाकेबाज प्रवासाबाबत देसाई म्हणाले, 'मला इतिहासाची खूप आवड आहे. त्यामुळेच इतिहासाचे एकेक पान मी उलगडत जाणार आहे. "राजा शिवछत्रपती' मालिका आम्ही 240 भागांची बनविली होती. आता चित्रपट काढणार आहोत. त्याचे लेखन प्रताप गंगावणे करणार आहेत. याशिवाय गुलजार यांनी लेखन करावे, अशी माझी इच्छा आहे. त्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट बनविणार असल्यामुळे हॉलीवूडच्या एका लेखकाची मदतही घेणार आहोत.''