Saturday, May 22, 2010

पुन्हा शिवाजी महाराज अवतरणार
-
Friday, May 21, 2010

मुंबई - "राजा शिवछत्रपती' या मालिकेत शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारून डॉ. अमोल कोल्हे घरोघरी पोचले होते. ही मालिका आणि त्यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा तीच भूमिका साकारायचे ठरविले आहे. "राजमाता जिजाऊ' या चित्रपटात ते छत्रपती शिवाजी महाराज बनलेले आहेत.

निर्मात्या मंदाताई निमसे आणि दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई यांचा जीवनपट "राजमाता जिजाऊ' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे ठरविले आहे. यामध्ये जिजाबाईंची भूमिका सिंदखेडजवळील चिखली गावातील डॉ. स्मिता देशमुख साकारीत आहेत; तर छत्रपती शिवाजी डॉ. अमोल कोल्हे बनलेले आहेत. पुण्याजवळील भोरच्या वाड्यात तसेच पैठण येथे या चित्रपटाचे आतापर्यंतचे चित्रीकरण झालेले आहे. याबाबत दिग्दर्शक यशवंत भालकर म्हणाले, ""अमोल कोल्हे यांची "राजा शिवछत्रपती' ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

माझ्या घरची मंडळी ती पाहात होते. त्यांनीच मला तुम्ही शिवरायांच्या भूमिकेसाठी अमोल यांना घ्यावे, असा आग्रह धरला. त्यामुळे अन्य कुणाचा विचार न करता आपण त्यांची निवड केली. कारण एखाद्या नवोदिताची निवड केली असती, तर त्याने त्या भूमिकेला कितपत न्याय दिला असता, असा प्रश्‍नही माझ्यासमोर होता. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ""खरोखरच "राजा शिवछत्रपती' मालिकेबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. निर्माते नितीन देसाई यांनी उच्च निर्मितीमूल्यांतून ही मालिका बनविली होती. यामध्ये आपण साकारलेली छत्रपतीची भूमिका अवघड होती. ही भूमिकेमुळेच "राजमाता जिजाऊ' हा चित्रपट आपणास मिळाला. त्या मालिकेत आपण एका जाणत्या राजाची भूमिका केली होती. आता या चित्रपटात आदर्श मुलगा आपण बनलो आहोत. पुन्हा शिवाजी महाराज साकारायला मिळाले त्याबद्दल आपणास आनंद आहे.''

posted by- स्वप्नील कदम (मंदाताई निमसे आणि अमोल कोल्हे ह्यांच्या परवानगी वरून..)

original news- संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवा..thanks..

अधिक माहितीसाठी - www.rajmatajijau.com

Dr.Amol Kolhe In Marathi Movie "Rajmata JIjau"

भोरच्या राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’चे चित्रीकरण
भोर, १२ एप्रिल/वार्ताहर
भोर येथील संस्थानकालीन राजप्रासादात ‘राजमाता जिजाऊ’ या संस्कारक्षम सामाजिक व ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. अजून तीन दिवस ते या ठिकाणी चालणार आहे.
शिर्डी येथील जिजाई चित्र संस्थेमार्फत हा चित्रपट निर्माण केला जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊंनी श्री शिवाजीमहाराजांना घडविण्यासाठी सारं आयुष्य वेचलं. त्यांच्याजवळ धाडस, मुत्सद्दीपणा, सामथ्र्य हे गुण होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पत्नी, माता, मुलगी, सून, सासू, आजी, गुरू, मित्र, सखा, न्यायदेवता आणि पालनकर्ता अशा विविध भूमिका प्रसंगानुरूप उभ्या करून श्री शिवाजीमहाराजांना स्वराज्य मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
अशा कर्तृत्वशाली मातृशक्तीचा एक वेगळा आविष्कार आजच्या तरुणाईला आणि महिलावर्गालाही प्रेरणादायी ठरावा, अशारीतीने या चित्रपटात जिजाऊंचे आदर्श चित्रण करण्यात आले आहे.
मदन पाटील यांच्या ‘जिजाऊ साहेब’ या ग्रंथावर आधारित चित्रपटाची कथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.
शिर्डी येथील अस्तगावमधील सामाजिक कार्यकर्त्यां मंदा शरद निमसे हा चित्रपट निर्माण करीत आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे शिष्य व चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
जिजाऊंच्या मध्यवर्ती व मुख्य भूमिकेत बुलढाणा येथील विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख काय करीत आहेत. श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे आहेत. याशिवाय मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर यांच्यासह सुमारे १०० अन्य कलाकार सहभागी झाले आहेत. श्रीरामपूरच्या बाबासाहेब सौदागर यांनी गीतलेखन केले आहे. शशांक पवार संगीताची बाजू सांभाळत आहेत. कैलाश खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उमप हे गायक यात गाणार आहेत. ऑस्करविजेता ‘स्लॅम डॉग’चे राहुल खंदारे यांच्याकडे निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री शिवछत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊमातेची अलौकिक चरित्रकथा या समाजाला आदर्शवत, दिशादर्शक ठरेल व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश त्यातून मिळेल. घराघरांत जिजाऊ जातील हाच महत्त्वाचा उद्देश या चित्रपटनिर्मितीमागे असल्याचे मनोगत निर्मात्या मंदा निमसे यांनी व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. येत्या सप्टेंबपर्यंत हा चित्रपट पूर्ण होईल असे सांगण्यात आले.

for more information visit- www.rajmatajijau.com - swapnil kadam (source-lok-satta,lok-mat)

पुणे - ''मुलाला घडविण्याची जिद्द जोपासणाऱ्या व त्याच्या कर्तृत्वाने तृप्त होण्याची आस बाळगणाऱ्या प्रत्येक आईमध्ये एक समर्थ जिजाऊ दडलेली असते,'' असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या "कादंबरीमय शिवकाल' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, कुलकर्णी व दिग्दर्शक हेमंत देवधर यांच्या हस्ते झाले. गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ, इतिहासप्रेमी मंडळ व मृण्मयी प्रकाशन यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वीणा देव व प्रा. विजय देव या प्रसंगी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, ""मातुःश्री जिजाऊंच्या मनातील स्वातंत्र्याची ऊर्मी, मुलाला घडविण्याची जिद्द, कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता या वृत्ती केवळ अद्वितीय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समर्थ स्त्रीत्वाचे दर्शन घडते. शिवछत्रपतींनी आपल्या मातेने दिलेले सर्व संस्कार घेतले. अशीच जिजाऊ प्रत्येक आईमध्ये दडलेली असते. मात्र, आज किती मुलगे शिवबा असतात, याचाही विचार होण्याची गरज आहे.''

डॉ. कोल्हे म्हणाले, ""शिवछत्रपतींच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचे पैलू आजही पूर्णतः उलगडलेले नाहीत. ते एक चैतन्य आहेत. भूमिका साकारताना त्यांच्यातले माणूसपण कमालीचे भावले.''

posted by- swapnil subhashrao kadam स्वप्नील कदम (source-www.esakal.com)

शिवरायांची महती अवर्णनीय - अमोल कोल्हे
सकाळ वृत्तसेवा
पुणे - ""शिवछत्रपतींच्या कार्याची महती अवर्णनीय आहे. त्यामुळेच साडेतीनशे वर्षे उलटूनही महाराष्ट्राने त्यांना आपल्या हृदयात जपले आहे. "शिवाजी महाराज जन्माला यावेत ते माझ्याच घरात' अशी काळानुरूप बदललेली सर्वसामान्यांची भूमिका आज अनुभवण्यास मिळते,'' अशी भावना प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

वसंतदादा सेवा संस्था प्रियांकाजी महिला उद्योग संस्था यांच्यातर्फे यंदाचा "राजीव गांधी कला गौरव पुरस्कार' डॉ. कोल्हे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, संस्थेचे अध्यक्ष संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे, सुनील महाजन, बालकलाकार मंदार चिकणे या प्रसंगी व्यासपीठावर होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, ""शिवछत्रपतींची भूमिका साकारल्यामुळे जो सन्मान मिळतो, तो माझा एकट्याचा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. महाराजांची नुसती भूमिका करण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. यापुढे हेच ध्येय ठेवून वाटचाल करणार आहे. पूर्वी "शिवाजी महाराज जन्मावे ते शेजारच्या घरात' अशी भावना आता बदललेली पहावयास मिळते. आज प्रत्येक मुलाला आपण महाराज व्हावे असे वाटणे हीच त्यांच्या कार्याची महती आहे.''

मोरे म्हणाले, ""शिवछत्रपतींचे कार्य इतके समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे, की ते सतत नव्या स्वरूपात समोर आणावे लागणार आहे. आज त्यांची विचारसरणी समोर ठेवून काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे.''

बागवे म्हणाले, ""जाती-धर्माच्या पलीकडे गेलेले आणि सर्वसामान्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असणारे शिवछत्रपतींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. कार्यकर्त्यांनी नेहमीच त्यांचा आदर्श ठेवावा. देशाच्या आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन ज्यांनी सतत कार्य केले, अशा राजीव गांधींच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा पुरस्कार ही गौरवाची बाब आहे.''
बालगुडे यांना प्रास्ताविक केले.